महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, प्रवास करणाऱ्यांसाठी होणार फायदा. Railway News Maharashtra

पुणे : Railway News Maharashtra :  पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनल विकसित करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, हडपसर टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काही महिन्यांत येथेून महत्त्वपूर्ण गाड्यांना प्रस्थान देण्यात येणार आहे.

हडपसर टर्मिनलवरून दोन गाड्या धावणार

रेल्वे विभागाकडून समोर आलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी 2026 (प्रजासत्ताक दिन) पासून पुणे स्थानकावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या आता हडपसर टर्मिनलवरून सोडल्या जाणार आहेत.

यात खालील दोन गाड्यांचा समावेश आहेः Railway News Maharashtra

  • हडपसर – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस.
  • हडपसर – हरंगुल स्पेशल.
  • हा निर्णय निश्चितच पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यास मदत करणार आहे. पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगमध्ये गती येण्यासाठीही हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.
Read more.....  खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पहा संपूर्ण माहिती. Private employees news

हडपसर टर्मिनलचे काम किती प्रगतीपथावर?

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे टर्मिनलचे 90% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जलदगतीने सुरू असून या 

  1. प्रवासी सुविधा
  2. प्लॅटफॉर्म विस्तार
  3. पार्किंग क्षेत्र
  4. वाहतूक व्यवस्थापन

या सुविधा मोठ्या प्रमाणावर अद्ययावत केल्या जात आहेत.

सध्या येथून 12 नियमित व विशेष गाड्या धावत असून 10 गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात आला आहे.

रेल्वेच्या योजनेनुसार, पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगदरम्यान काही गाड्यांचे संचालन हडपसर आणि खडकी येथे टप्प्याटप्याने हलवले जाणार आहे.

नवीन वेळापत्रक कसे असेल? Railway News Maharashtra

रेल्वे विभागानुसार, नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल:

  • हडपसर – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस
  • प्रस्थान (दररोज): रात्री 9.50 वाजता.
  • परतीचे आगमन: पहाटे 4.35 वाजता
  • हडपसर – हरंगुल स्पेशल
  • प्रस्थान (दररोज): सकाळी 6.20 वाजता
  • परतीचे आगमन: रात्री 8.45 वाजता
Read more.....  आनंदाची बातमी, रेशनकार्डधारकांना या नवीन गोष्टी मिळतील. Ration card news 

या निर्णयाचा पुणेकरांना फायदा काय?

पुणे स्थानकावरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार

रिमॉडेलिंगचे काम जलद पूर्ण होण्यास मदत

हडपसर परिसरातील प्रवाशांना अधिक सोयी

पुणे शहरातील रेल्वे वाहतुकीत शिस्त आणि सुलभता.

Railway News Maharashtra

Leave a Comment